महत्त्वाच्या बातम्या

संगम माहुली येथे कृष्णा नदी व घाट स्वच्छता मोहीम अभियानाचा शुभारंभ

      छत्रपती शाहू महाराज यांचा  राज्याभिषेक दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य  साधून श्री आदिशक्ती तुळजाभवानी ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष ठाकूर सरदार श्री विजयसिंह बर्गे यांनी आज दक्षिणकाशी अर्थात संगम माहुली येथे कृष्णा नदी व घाट स्वच्छता मोहीम अभियानाचा शुभारंभ केला. हिंदू धर्मात नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे यामध्ये प्रामुख्याने गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचा समावेश होतो यामधील कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते. या नदीच्या उगमापासून दोन्ही काठावर हिंदू देवदेवतांची मंदिरे असून अनेक ठिकाणी पेशवेकालीन, शिवकालीन घाट बांधले गेले आहेत. ही सर्व मंदिरे हेमाडपंती शैलीची आहेत. आज या नदी मध्ये कारखान्याचे, घरांचे सांडपाणी सोडले जाते.प्लास्टिक व निर्माल्य तसेच अस्थी  विसर्जन यामुळे जलप्रदूषणात आणखी वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षापासून या नदीमध्ये जलपर्णी या वनस्पतीने नदीपात्रात अक्राळ विक्राळ रूप धारण केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून पाण्यास दुर्गंधी येत आहे.

     त्यामुळे गंगा नदी स्वच्छता अभियान ज्या पद्धतीने राबवले गेले त्याच धर्तीवर कुंभमेळ्याचे औचित्य साधुन दक्षिणगंगा नदी अर्थात कृष्णा नदी स्वच्छता अभियान राबवण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले असून स्थानिक नागरिक सेवा प्रेमी युवक युवती ग्रामपंचायत तसेच प्रशासन यांच्या सहकार्याने आम्ही ते पेलू असा विश्वास ठाकूर सरदार श्री विजयसिंह बर्गे यांनी व्यक्त केला. तसेच हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी येथे काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे पण त्यांनी सांगितले. तसेच फक्त कृष्णा नदी नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नद्या स्वच्छ करण्याचे गरजेचे असून या कामे स्थानिक युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी संगम माहुलीचे  सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते यांच्या सह सर्व ग्रामस्थांनी व तसेच शिवप्रेमी युवक युवतीने कृष्णा नदीस्वच्छता अभियानात स्वयं स्फूर्तीने भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!