सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुत्सद्दी, धोरणी आणि लढवय्या कर्तृत्वातून लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून देणाऱ्या जिजाऊ माँ साहेब व देशाच्या युवाशक्तीला सुंदर मौलिक विचार देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात या दोन महान विभूतीना कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी संचालक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले, विद्यावाणीचे संचालक डॉ. श्रीदत्त गायकवाड, प्रा. बाबासाहेब दुधभाते आदी मान्यवरांसह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
