महत्त्वाच्या बातम्या

संगीतकार ए. आर. रहमान यांना सौम्य डिहायड्रेशन; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 जागतिक कीर्तीचे संगीतकार ए.आर.रहमान यांना सौम्य डिहायड्रेशनची लक्षणे जाणवल्याने आज सकाळी अपोलो हॉस्पिटल, ग्रीम्स रोड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना योग्य उपचार देण्यात आले आणि काही वेळातच त्यांना डिस्चार्ज करण्यात आले.

       रहमान यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून ती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुरेशी विश्रांती घ्यावी आणि योग्य प्रमाणात पाणी प्यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.

दरम्यान, ए. आर. रहमान हे सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!