सपोनि.अक्षय सोनवणे यांची म्हसवड मध्येही धडाकेबाज कामगिरी
सपोनि.अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्याप्रमाणेच म्हसवडमध्ये देखील आपल्या धडाकेबाज कामगिरीची झलक दाखवत म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना मोठ्या शिताफिने अटक केली आहे. मोठेवाडी(वरकुटे म्हसवड) वडजल (ता.माण) या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या कुटुंबाच्या रखवाली मध्ये असताना दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना फुस लावून अपहरण केले असल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती.
परंतु पहिल्यापासूनच आपल्या कामगिरीमध्ये माता व भगिनींच्या सुरक्षेला महत्त्व देणारे सपोनि.अक्षय सोनवणे यांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली व तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे घटनेच्या तपासाला सुरुवात झाल्यानंतर पंढरपूर आणि कराड या ठिकाणी आरोपी लपलेले असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.त्यानंन्तर दोन्हीही आरोपीना लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक करून पुढील तपास सुरू केल्यामुळे सपोनि. अक्षय सोनवणे यांचे जनतेतून आभार मानले जात आहेत.सदरची कारवाई सपोनि.अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघमोडे,म. पो. ह. मैना हांगे, पो ना.अमर नारनवर, पो. कॉ. नवनाथ शिरकुळे, पो. कॉ. अनिल वाघमोडे यांनी केली आहे.
