महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केला 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू

    सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहे.
       जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी लागू केलेल्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात आजपासून दिनांक ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!