महत्त्वाच्या बातम्या

सातारा व दहिवडी येथील सरदार १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

सातारा: युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांची सहभागिता आहे. सातारा शहरातील पदयात्रेचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता गांधी मैदान, राजवाडा येथे जिल्हाधिकारी  संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून होणार आहे. पदयात्रेचा मार्ग गांधी मैदान, राजवाडा सुरु होऊन छ. शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे समाप्त होणार आहे. पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे.

       दहिवडी शहरामध्ये पदयात्रेचा दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता दहिवडी कॉलेज दहिवडी परिसरातून शुभारंभ होऊन छ. शिवाजी महाराज चौक मार्गे – महात्मा गांधी विद्यालय समोरून बाजार पटांगण – गणेश मंदिर – सिद्धनाथ मंदिर परिसरापासून आलेल्या मार्गाने दहिवडी कॉलेज दहिवडी येथे समारोप होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे असा आहे. , शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने भविष्यातील भारताच्या निर्मितीत तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नृत्य आणि प्रेरणादायी भाषणे या माध्यमातून देशभावना जोपासली जाईल. भविष्याला दिशा देणाऱ्या या पदयात्रेत तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

        कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विविध शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी https://mybharat.gov.in/unity_march_registration/457137608457  या संकेतस्थळावर खुली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!