साताऱ्यातील गांधी मैदान येथे दिवाळी पहाट उत्साहात साजरी
हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेचआनंद द्विगुणीत करणारा सण म्हणून याची ख्याती आहे.पहिल्या दिवशी स्नान झाल्यानंतर पावले वळतात ते दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी गेल्या अनेक वर्षापासून राजवाडा येथील गांधी मैदानावर विविध संस्थामार्फत दिवाळी पहाटेचे आयोजन केले जाते.यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे मा.सदस्य व सदर बझार येथील हॉटेल शिंदे सरकार चे सर्वेसर्वा संदीप शिंदे यांनी केले होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात मा. जिल्हा परिषद सदस्ययांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.तदनंतर साज और आवाज आणि स्वर साधना यांच्यामार्फत सुरेल गाण्यांची मालिका गुंफण्यात आली.
गायक विनय कुमार,रमीजा सय्यद, स्नेहल चिंचणे, हेमंत गिरी,राजेंद्र पाटील,अजय घोरपडे यांनी आपल्या सुरेल आवाजाने भारावून टाकले. हलक्या गुलाबी थंडीत निवेदक माधव मेंडीगिरी यांनी आपल्या खुमासदार निवेदन शैलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमास सातारा शहरातील वृद्धांनी हजेरी लावली होती. त्यामुळेच भावगीते, भक्ती गीत, प्रेम गीत,बडबड गीते, विरह गीत अशा अनेक हिंदी मराठी गाण्याची दिलखुलास मेजवानी रसिकांना मिळाली .त्यातील अनेक गाण्यांना रसिकांनी दिलखुलास दाद दिली.वन्स मोअर ची मागणी केली.
‘चवीने खाणार त्याला आम्ही देणार’ अशी पंचलाईन असलेल्या हॉटेल शिंदे सावकार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे तमाम रसिकांनी गाण्याची मेजवानी अनुभवली.
कार्यक्रमाचे आयोजक मा जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी तमाम सातारवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमास हजेरी लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
