साताऱ्यातील भुरटा जयवंत कांबळे खंडणीखोर देतोय नागरिकांना नाहक त्रास
सातारा शहर व परिसरामध्ये खंडणीखोर धुमाकूळ माजवत आहेत. गल्ली बोळातले स्वयंघोषीत भाई आपल्या दोन चार फटरांना घेऊन सामान्य नागरिकांना दमदाटी करून खंडणी मागत आहेत. सध्या जयवंत शिवदास कांबळे ऊर्फ जे. के. हा स्वतःला समाजसेवक म्हणत असून तो अनेक लोकांना खंडणी तसेच लुटमार अशा अनेक प्रकरणात त्याचे नाव पुढे येत आहे. माहितीचा अधिकार मागवून त्याचा गैरवापर करणे हा तर त्याचा धंधाच झाला आहे.
एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू असेल तर हे बांधकाम अतिक्रमण मध्ये आहे तुम्ही इथे कसे बांधू शकता मी तुमच्या विरोधात कारवाई करायला लावेन जर कारवाई नको असेल तर एक लाख रुपये द्या आणि नाही दिले तर तुम्हाला जीवे मारून टाकेन अशा प्रकारे खंडणी मागण्याचे सुद्धा काम हा करत असतो.
आतापर्यंत त्याच्या विरोधात अनेक तक्रारी गेल्या असून सुद्धा अजून पर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली गेली नाही. सहा महिन्यापूर्वी दिलीप पवार यांच्याकडे खंडणीची मागणी केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये जयवंत कांबळे वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयवंत कांबळे हा अमली पदार्थाचे सेवन व विक्री सुद्धा करत असल्याची माहिती समोर आली आहे. जर या सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती आहेत तर प्रशासन त्याच्या वरती कारवाई का करत नाही? की प्रशासनाचा यात काय फायदा आहे ? प्रशासन बोगस खंडणीखोराला भीत आहे का? अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे.
