महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात निकालाच्या आधीच शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयाचे पोस्टर झळकले

       विधानसभा निवडणुक 20 तारखेला पार पडली. आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. त्यातच सातारा जावळी मतदार संघात निकालापूर्वीच आ. शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांची गुलालाची तयारी  झाली आहे. शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित मानला जात असल्याने ठिकठिकाणी आधीच त्या आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे.

       सातारा विधान सभा मतदार संघात 63 % मतदान झाले आहे. जिल्ह्यातील 8 मतदार संघांचा निकाल जाहीर होणार आहे.गेल्या 20 वर्षांपासून सातारा जावळी मतदार संघात शिवेंद्रराजे आमदार आहेत आणि यंदाही तेच विजयी होणार असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. सातारा जावळी मतदार संघातील उमेदवार शिवेंद्रराजे व शिवसेना ठाकरे गटा कडून अमित कदम यांनी जोरदार प्रचार करत निवडणुकीच्या रिंगणात पाय रोवत आपल्या विकास कामाचा आढावा देत जनसंवाद साधला. गावोगावी भेट देऊन सभा घेतल्या.

       आता निकालाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला असताना शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात आधीच विजयाचे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. नेहमी प्रमाणे शिवेंद्रराजेच विजयी होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना असल्याने विजयाचा गुलाल आपलाच अशा आशयाचे पोस्टर ठिकठिकाणी लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!