महत्त्वाच्या बातम्या

युक्रेन वर रशियन हायपरसोनिक ओरेश्निक क्षेपणास्त्राचा हल्ला

      रशियाने 21 नोव्हेंबर रोजी पहाटे पूर्व युक्रेन मधील डनिप्रो येथील  पिव्हडेनमॅश सुविधांवर ओरेश्निक एक मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने हल्ला केला. ओरेश्निक हे 2500-3000 ते 5500 किमी दरम्यान अंतर असलेले घन इंधनयुक्त क्षेपणास्त्र आहे. 21 नोव्हेंबर रोजी युक्रेन  मधील डनिप्रो येथील  क्षेपणास्त्र आणि अंतराळ रॉकेट  निर्मिती केंद्र पिव्हडेनमॅश येथे ओरेश्निक लाँच करण्यात आले. रशियाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी अशा कृती आवश्यक होत्या असे पुतीन म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या हल्ल्याचे वर्णन नवीन मध्यम पल्ल्याच्या  क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी म्हणून केले.

       युक्रेनने या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाच्या भूभागावर अमेरिकन आणि ब्रिटिशनिर्मित क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे पुतिन म्हणाले.या हल्ल्यात युक्रेन मधील एका सुविधेला लक्ष करण्यात आले होते. जेथे अमेरिकेने लहान आणि मध्यम पल्ल्याच्या  क्षेपणास्त्राची  निर्मिती करण्याची योजना आखली होती. हे क्षेपणास्त्र मॅच 10 पर्यंत वेगाने प्रवास करते त्यामुळे युरोपमधील युनायटेड स्टेट्स ने तयार केलेल्या हवाई संरक्षण प्रणाली सह विद्यमान हवाई संरक्षण प्रणालींना रोखणे अशक्य होते.

    रशियन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रांचा पल्ला पाच हजार किलोमीटर होता. युक्रेन  मध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या महत्वपूर्ण वाढीमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी घोषित केले की, रशियाने युक्रेनच्या  संरक्षण सुविधाला लक्ष करत आपले सर्वात नवीन हायपरसोनिक मध्यम  श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ओरिश्निक तैनात केले आहे. हे क्षेपणास्त्र संपूर्ण युरोपमधील लक्ष्यांवर मारा करू शकते आणि  अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत देखील पोहोचू शकते. पुतीन म्हणाले युक्रेन युद्ध जागतिक संघर्ष कडे जात आहे.

     युक्रेनला पाश्चिमात्यांनी पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा बदला म्हणून  क्षेपणास्त्र स्ट्राइकचे समर्थन केले. ज्याचा वापर रशियन प्रदेशात खोलवर लक्ष्य करण्यासाठी केला गेला असल्याचा दावा केला. जर पश्चात्य  राष्ट्रांनी युक्रेनला  शस्त्राचे पुरवणे सुरू ठेवले तर भविष्यातील  संभाव्य हल्ल्यांचा इशारा दिला. युक्रेन व रशियातील तणाव वाढत असताना ओरेश्निक आधुनिक युद्धातील व्यापक तंत्रिक आणि धोरणात्मक बदलांचे प्रतीक होऊ शकते. या संघर्षात हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर धोकादायक वळणाचे संकेत देते. ज्याचा जागतिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेसाठी संभाव्य परिणाम होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!