महत्त्वाच्या बातम्या

सुशीला शंकर गाढवे महाविद्यालयाच्या वैष्णवी पवारने मिळवले घवघवीत यश…. GD कॉन्स्टेबल पदी नियुक्ती

     सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी पवार जिडी कॉन्स्टेबल पदाची  परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे.वैष्णवी पवार हीने  रसायनशास्त्र विषयातून  पदवी प्राप्त केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाने ही परीक्षा फेब्रुवारी-२०२३ घेतली होती व अंतिम निकाल ऑगस्ट २०२३  लागला होता. या मध्ये जीडी-कॉन्स्टेबल पदावर वैष्णवीची निवड झाली आहे. लेखी परीक्षा शारीरिक परीक्षा व वैद्यकीय चाचणीत पात्र होऊन ०१ जानेवारी २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ अखेर वैष्णवीने खरका,पंजाब येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तिची पश्चिम बंगाल येथे नियुक्ती झाली आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण शिवाजीनगर(ता. खंडाळा)येथे झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे झाले आहे.

     या दिमाखदार यशाबद्दल महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. हणमंत जाधव यांच्या शुभहस्ते श्रीफळ, गुच्छ व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. वैष्णवी मनोगत व्यक्त करताना म्हणाली-“वडिलांचा केशकर्तन व्यवसाय व शेती गृहिणी असणारी आई यांनी मला वेळोवेळी पाठबळ दिले. यासोबत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांचा यात वाटा असून, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीतून पहिल्या प्रयत्नात मला यश मिळाले.”

     यावेळी विभागप्रमुख प्रा.सारिका सुर्वे, प्रा. रविशा पवार,प्रा.सुचेता मोरे,प्रा. प्राची गायकवाड, कौशल्य विकास व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अमीर इनामदार, कार्यालयीन कर्मचारी हणमंत यादव, प्रतिक गाढवे, गणेश ढमाळ, धनंजय गायकवाड, विशाल पवार उपस्थित होते. खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे सर,सचिव संजीव(अनिरुद्ध)गाढवे,सर्व संचालक मंडळ,कार्यालयीन प्रमुख संतोष गाढवे यांच्याकडून वैष्णवीला देशसेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!