महत्त्वाच्या बातम्या

सेवा मार्गावर पडलेल्या खडीमुळे होतेय घसरगुंडी 

      पुणे बंगलूर महामार्गावर रायगावं कडून साताराकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर काँक्रिट खडी पसरल्यामुळे दुचाकी वाहणाचलकांची मोठी घसरगुंडी होऊ लागली आहे. यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडू लागले आहेत. रायगावं फाट्यावरून ढगेवाडी येथे काँक्रिट बनविण्याचा प्लांट आहे. या ठिकाणाहून अनेक डंपर मागणीनुसार बाहेर काँक्रिट घेऊन जात असतात मात्र, हे डंपर कोणतीही काळजी न घेता उलट्या दिशेने वाहतूक करत असतात. यावेळी सातारा दिशेला जाताना चढ असल्याने या डंपर मधून हे काँक्रिट सेवा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे बारीक खडी, तसेच सिमेंट देखील येथे पडल्याने रस्त्याची दुरावस्था तर होत असतेच पण जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशी वाहणाचलकांची मोठी कसरत होत आहे.

       यामुळे आजपर्यंत येथे अनेक अपघात घडले असून, अनेक जण गंभीर  जखमी देखील झाले आहेत. या ठिकाणी अनेक कंपन्या, शाळा, महाविद्यालये असल्यामुळे मोठी वाहतूक या सेवा रस्त्यावरून होत असते. सबंधित प्लांट चालकाकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे दिसत आहे. धोकादायक पद्धतीने माल घेऊन जाणारे डंपर वाहतूक करत असतात. अनेक दुचाकी वाहनचालकांना याचा मोठा त्रास होत आहे.
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!