खुनाच्या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल
सातारा शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून अशीच एक घटना समोर आली आहे.परवा एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला गेला.
सातारा शहरातील केसरकर पेठे येथे राहणाऱ्या स्वप्निल सतीश दबडे यांच्या वर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला गेला.या बाबतीत तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 19 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास स्वप्निल सतीश दबडे (रा.केसरकर पेठ) सातारा यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आला.
या प्रकरणांमध्ये दुर्गा पेठ येथील तीन जणांचा समावेश आहे. आकाश शनी कांबळे, शौर्य सुनील कांबळे व शूर सुनील कांबळे सर्व राहणार दुर्गा पेठ तोफखाना यांनी स्वप्नील सतीश दबडे यावर वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला.या तिघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करत आहेत.
