महत्त्वाच्या बातम्या

सर्वांनी कायद्याचे पालन करावे आयुष्य सुखी होईल-निर्भया पथक प्रमुख वैभवी भोसले

     राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, खंडाळा या ठिकाणी निर्भया पथकाकडून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण राहूल धस व पोलीस निरीक्षक खंडाळा श्री. सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकामार्फत वैभवी भोसले, पोलिस हेड कॉन्स्टेबल तथा निर्भया पथक प्रमुख, फलटण उपविभाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांनी कायद्याचे पालन केले तर आयुष्य सुखी होईल तसेच मुलांना किंवा मुलींना सुरक्षे संबंधी काही समस्या असतील तर त्यांनी टोल फ्री क्रमांक 112,1098 व 1091 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.

     याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे .विद्यार्थी जेवढे सोशल मीडियापासून दूर राहतील तेवढेच ते प्रगतीपथावर जातील असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल नेवसे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण बोरगावे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल तळपे मॅडम, विद्यालयाच्या उपप्राचार्या अरुंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सौ.सुशीला मोहिते, पर्यवेक्षक  श्री. धनंजय महामूनी,विद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!