सोलापूर प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेत संपवले जीवन
सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवलं आहे. त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत जीवन संपवलं आहे. या घटनेमुळं सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
