महत्त्वाच्या बातम्या

सौरभ गडदे याची अग्निवीर भारतीय नौसेनेत निवड 

 
सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, बीए भाग ०२ भूगोल विभागात शिकणारा विद्यार्थी सौरभ बापूराव गडदे याची मनुष्यबळ व प्रतिभा विकास संचालनालय,संरक्षण मंत्रालय केंद्र सरकार यांनी घेतलेल्या परीक्षेत २२ ऑक्टोबर २०२४ अंतिम निकालात भारतीय नौसेना-अग्निवीर मध्ये निवड झाली. सौरभचे प्राथमिक शिक्षण खेड बु.|| (ता. खंडाळा)येथे झाले असून, अहिरेश्वर विद्यालय, अहिरे येथे माध्यमिक शिक्षण झाले. राजेंद्रने उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेताना NCC बेस्ट कॅडेट म्हणून विशेष कामगिरी बजावली. ०९ जून २०२४ रोजी संरक्षण मंत्रालयाने अग्निवीर परीक्षेचे आयोजन केले होते. यामधील पूर्व मुख्य व शारीरिक चाचणीत पात्र होऊन सौरभने यश संपादित केले.
याबद्दल प्राचार्य डॉ. हणमंत जाधव यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भूगोल विभागप्रमुख प्रा. अशाली फडतरे, प्रा. सुजाता पडळकर, इतिहास विभागप्रमुख प्रा. प्रतीक्षा माने, बीसीए विभाग प्रा. काजल पाटील व स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास विभागप्रमुख प्रा.अमीर इनामदार,व्ही.एन. गाढवे, नवनाथ पाचे,   कार्यालयीन कर्मचारी हणमंत यादव, प्रतिक गाढवे, गणेश ढमाळ, धनंजय गायकवाड उपस्थित होते. खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे सर,सचिव संजीव(अनिरुद्ध)गाढवे,प्राचार्य शब्बीर नालबंद,सर्व संचालक मंडळ, कार्यालयीन प्रमुख संतोष गाढवे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!