स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात घेतले जाणार जनमत आणि मतदानोत्तर चाचणी
सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातही नमुन्याच्या (सॅम्पल) आधारावर विविध चाचण्या घेतल्या जातात. त्यातून निवडणुकांच्या निकालांबाबत वर्तविल्या जाणा-या अंदाजांचा / निष्कर्षांचा लोकमतावर / मतदारांवर प्रभाग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विविध चाचण्यांच्या निष्कर्षांचा मतदारांवरील संभाव्य प्रभाव टाळण्यासाठी, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी समाप्तीपासून ते मतदानाची वेळ संपल्याच्या पुढील एक तासापर्यंत अशा चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करता येणार नाहीत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
