स्वारगेट प्रकरणाबाबत नवीन अपडेट समोर
संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील संशयीत आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यास शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायालयाने १२ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
गेले दोन दिवस पोलीस पथके ड्रोनच्या माध्यमातून व पोलीसाच्या तुकडया त्यांच्या तपास मार्गावर होत्या. संशयीत आरोपी रात्री पाणी पिण्यासाठी गावात गेला असता संबंधीत इसमाने सदर घटना पोलीस प्रशासनाला कळवली तदनंतर पोलीस प्रशासनाने धाव घेत संशयीत आरोपीला पकडण्यात यश मिळाले. सदर संशयीत आरोपी दत्तात्रय गाडे हा प्रथम दर्शनी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अब्रू वेशीवर टांगली गेली.
