हरियाणा निवडणूकीत मेहमचे उमेदवार आणि माजी आमदार आनंद डांगी यांच्यात हाथापायी
हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी निवडणूक केंद्रावरील खोली क्र. 134 मध्ये आनंद डांगी आणि बलराज कुंडू यांच्यामध्ये हाथापायी झाली. हरियाणा विधानसभेचे सर्व 90 सदस्य निवडण्यासाठी आज दि 5 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे आयोजन केले आहे.
माजी आमदार आनंद डांगी हे हरियाणातील मेहम विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय काँग्रेसचे हरियाणा विधानसभेचे सदस्य आहेत तर बलराज कुंडू हे जनसेवक पक्षाचे उमेदवार आहेत. बलराज कुंडू यांनी माजी आमदार आनंद डांगी आणि त्यांच्या साहाय्यकावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कुंडू यांचे कपडे फाडले आणि त्यांना मारहाण केली असा त्यांचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा ते मतदान केंद्राला भेट देत होते. मेहम विधानसभा मतदार संघातुन बाहेर पडणाऱ्या आमदाराने असा दावा केला आहे की, आनंद सिंग डांगी यांना त्यांचा मुलगा आणि काँग्रेसचे उमेदवार बलराम डांगी यांच्या पराभवाची जाणीव झाली आणि ते खळबळले.
बलराज यांनी मतदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. घटनेची खबर लागताच पोलिसांनी तेथील परिस्थिती आटोक्यात आणली. आज दि 5 ऑक्टोबर रोजी कडेकोट बंदोबस्तात हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीस सुरुवात झाली. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, काँग्रेसचे भूपिंदर सिंग हुडा, आणि विनेश फोगाट, जेजेपीचे दुष्यंत चौटाला, व अन्य 1027 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरवले जाईल. ज्यामध्ये 2 कोटी पेक्षा अधिक लोक मतदानास पात्र आहेत.निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी घोषित केला जाईल.
