महत्त्वाच्या बातम्या

‘हेरा फेरी ३’ वादावर बाबू भैय्यांचा मोठा खुलासा! अक्षय कुमारने पाठवलेल्या ‘२५ कोटींच्या’ नोटीसवर परेश रावल यांनी सोडले मौन!

मनोरंजन डेस्क: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रेंचायझी ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) बऱ्याच काळापासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटावरून मोठा भूकंप झाला होता, जेव्हा ‘बाबूराव’ म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अचानक या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे संतापलेल्या अक्षय कुमारने परेश रावल यांना थेट २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली होती. आता या संपूर्ण वादावर परेश रावल यांनी मौन सोडले असून अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.

विकी लालवाणी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी अक्षय कुमारसोबतच्या वादावर आणि २५ कोटींच्या कायदेशीर नोटीसवर उघडपणे भाष्य केले आहे.

“अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब झाला होता…”

परेश रावल यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, त्यांनी अक्षय कुमारसोबत काम करण्यास कम्फर्टेबल नसल्यामुळे चित्रपट सोडला होता का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, “नाही, अक्षयसोबत काम करण्यात कोणतीही अडचण नव्हती. तो केवळ एक कायदेशीर कराराचा (Contractual Obligation) विषय होता. या चित्रपटाचे मुख्य मालक फिरोज नाडियाडवाला आहेत, त्यामुळे त्यांची मंजुरी मिळाल्याशिवाय मी चित्रपटाला होकार देऊ शकत नव्हतो.”

अक्षय कुमारने पाठवलेल्या २५ कोटींच्या नोटीसवर बोलताना परेश रावल म्हणाले, “माझा असा विश्वास आहे की, ती नोटीस पूर्णपणे एक भावनिक प्रतिक्रिया (Emotional Reaction) होती. कदाचित अक्षयला वाटले असेल की, ‘परेश मला नकार कसा काय देऊ शकतो?’ तो त्या वेळी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ (Emotionally Disturbed) झाला असावा.”

कायदेशीर लढाईत पडायचं नव्हतं!

परेश रावल यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा ती कायदेशीर नोटीस आली, तेव्हा मी विचार केला की मी या कोर्ट-कचेरीच्या भानगडीत का पडतोय? मी इथे चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी आलो आहे की या वादात अडकण्यासाठी? म्हणूनच मी तेव्हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता.”

तथापि, हा वाद काही महिने चालल्यानंतर मिटला आणि परेश रावल पुन्हा एकदा या प्रोजेक्टमध्ये परत आले आहेत. अक्षय कुमार आणि त्यांच्यामध्ये नंतर कोणतीही औपचारिक चर्चा झाली नाही, पण त्यांनी पुढे एकत्र काम केले आणि वाद आपोआप मिटला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मी हेरा फेरीशी लग्न केलंय…’

‘हेरा फेरी ३’ सध्या कॉपीराईट आणि इतर कायदेशीर गुंतागुंतींमुळे रखडला असला, तरी चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. चित्रपटाचे भवितव्य काहीही असले, तरी परेश रावल बाबूरावच्या भूमिकेसाठी कटिबद्ध आहेत. ते म्हणाले, “जेव्हा कधी ‘हेरा फेरी ३’ चे शूटिंग सुरू होईल, मी तिथे असेन. मी या चित्रपटाशी लग्न केले  Paresh Rawal and Akshay Kumar Hera Pheri 3 Lawsuit Lokprant आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!