महत्त्वाच्या बातम्या

खेड ग्रामपंचायतीत सही घोटाळा- कारवाईला विलंब, राजकीय दबावाचा संशय

कृष्णा नगर तारीख 21: खेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शशिकांत फडतरे यांनी केलेल्या बोगस सही संदर्भातील दोषीं आढळलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

   खेड ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्यातील राजकीय सत्ता संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांचे दोन्ही आमदारां मधील राजकीय कलगीतुरा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु या वेळेला खेड ग्रामपंचायत ही वेगळ्या प्रकरणामुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

     खेड ग्रामपंचायत येथील गोकर्ण नगर बंधिस्त गटर प्रकरणी ग्रामपंचायतीमार्फत कामाला ठराव व वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. परंतु या कामाची वर्क ऑर्डर ठराव हे दोन्ही वरिल सही बोगस असल्याचे सांगत साहिल शेख यांनी लेखी तक्रार करून या प्रकरणात सरपंच, उपसरपंच, सदस्य व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव हे जबाबदार असून चौकशी व्हावी अशी मागणी खेड ग्रामपंचायत व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बुळवे यांच्याकडे करण्यात आली होती.

    23 मार्च 2023 रोजी उप अभियंता यांनी दिलेल्या आदेशात अंदाज पत्रकीय मागणी पत्र व ठरावाच्या आदेशाच्या सहाय्याभावी भिन्नता आढळल्याने ग्रामविकास अधिकारी शशिकांत फडतरे यांची चौकशी केली असता सदरच्या सह्या बोगस असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे 17 डिसेंबर 2024 रोजी गटविकास अधिकारी बुळवे यांनी या संदर्भात जबाबदार सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी खेड यांना लेखी आदेश दिले.

     27 जानेवारी 2019 रोजी ग्रामपंचायत अधिकारी संदीप लोढे यांनी शशिकांत फडतरे यांच्या बोगस सही प्रकरणातील सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार शहर पोलिस ठाणे, सातारा येथे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!