महत्त्वाच्या बातम्या

साडवलीतील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये औषधी वनस्पती संशोधनासाठी दोन दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न

देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींमधील जैवसक्रिय घटकांचे विलगीकरण व त्याचे निष्कर्षण या विषयावर दि. २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष श्री. रवींद्रजी माने आणि इतर मान्यवरांच्या  उपस्थितीत करण्यात आले. 

      या कार्यशाळेचा उद्देश फार्माकोग्नोसी आणि फाइटोकेमिस्ट्री या क्षेत्रातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व प्रयोगशील ज्ञान देणे हा होता. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक
म्हणून रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्रसिद्ध फार्माकोग्नोसी तज्ज्ञ प्रा. डॉ. के. एस. लठ्ठा यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या गाढ्या ज्ञानामुळे सहभागी संशोधकांना औषधी वनस्पतींपासून जैवसक्रिय घटक काढण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती आणि तत्सम प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.

      या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण २३ तसेच बंगळुरूमधून १ अशा एकूण २४ जणांनी सहभाग घेतला. सहभागी शिक्षक, संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचे आयोजक प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यशाळेचे समन्वयक म्हणून श्री. विवेक कुलकर्णी, श्री. रोहित राज, तसेच सहसमन्वयक म्हणून डॉ. मेधा खाडे, श्री. प्रशांत गुरव, श्री. निकुल पटेल आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. या दोन दिवसीय कार्यशाळेने फार्माकोग्नोसी व फाइटोकेमिस्ट्रीच्या क्षेत्रातील नव्या संशोधनासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

      कार्यशाळेचा समारोप संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. नेहा माने, श्री प्रद्युम्न माने यांच्या उपस्थितीत झाला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना देखील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. प्रशांत गुरव यांनी डॉ. के. एस. लठ्ठा, संयोजक, समन्वयक, संस्थापदाधिकारी आणि सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार आणले. या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींवरील संशोधनाला चालना मिळाली असून, भविष्यात या क्षेत्रात नवनवीन संशोधन संधी निर्माण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!