इस्लामपूर येथे केसरी भव्य बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद,देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
पेठनाका : रेठरेधरण (इस्लामपूर) येथे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या आयोजनाखाली “देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यत” पार पडली. या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते.
या वेळी वनश्री दूध संघाचे चेअरमन व भाजप नेते सम्राटबाबा महाडीक यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शिराळा विधानसभा आमदार सत्यजीतभाऊ देशमुख, जत विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर, विधान परिषद आमदार विक्रमजी पाटील, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची उपस्थिती होती.
तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदारभैय्या नलावडे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागरभाऊ खोत, अमोल पाटील यांच्यासह बैलगाडा शर्यतीचे शेकडो प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
