महत्त्वाच्या बातम्या

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ

     सरकारी काम असो किंवा शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या प्रमाणपत्रा बाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घोषित केला आहे.

 • जात पडताळणी प्रमाणपत्र 
 • उत्पन्नाचा दाखला
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट 
 • राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
     शासकीय कार्यालयात दाखल  करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात येणार आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
       यापुढे एका साध्या कागदावर (स्वसाक्षांकित)सेल्फ अटेस्टेट अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व  पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार असून  निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!