संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचा 8 मार्च रोजी साताऱ्यात निषेध
सातारा: मस्सा जोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रुर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ ८ मार्च या जागतिक महिला दिनी या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व सातारकर वासियांनी मोठ्या संख्येने पोवईनाका येथील शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी क्रांती मोर्चा राजधानी सातारा यां संघटनेच्या पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्याचबरोबर जात-पात, धर्म ,पक्ष यांच्या भिंती झुगारून मोठ्या संख्येने पुरुष महिला युवक युवती यांनी उपस्थित राहून कै सरपंच संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुंटुबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येणार आहेत.गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र गाजत आहे. या घटनांना लोकशाही पद्धतीने पायबंद घालण्यासाठी आपली उपस्थिती महत्वाची आहे. असे पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे
