शेवटच्या पौर्णिमेला सजली श्रींची नगरी
हिंदू वर्षानुसार शेवटची पौर्णिमा म्हणजे हुताशमी पौर्णिमा दि.१३ मार्च ( गुरुवार ) रोजी आहे.या उत्सवासाठी श्रींची गोंदवले नगरी सजली आहे.
पौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाला भाविकांची रेकोर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदवले चा आठवडे बाजार आणि शेवटची पौर्णिमा असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन चौकातच थांड मांडावे लागणार आहे. श्री भक्तांची गर्दी तर असणार आहे त्याचं बरोबर आठवडे बाजार साठी आजूबाजूच्या वाडीवस्ती हुन येणाऱ्या लोकांची देखील गर्दी राहणार असल्याने नक्कीच पोलीस प्रशासनादेखील करडी नजर ठेवावी लागणार आहे .
होळी निमित्य कोकणात जाणाऱ्या लोकांना जादा बसेस सोडल्याने त्याचे वेळापत्रक विस्कळीत असल्याने काही नियते रद्द ठेवण्यात आली आहेत त्यामुळे अतिरिक्त बसेस सातारा विभागाला चालवावी लागणार असल्याने खास करून दहिवडी आगार वर त्याचा भर राहणार आहे. मागील काही काळाचा विचार केला असता श्री डूबल यांच्या कडून अत्यंत बारकाईने आणि उत्तम नियोजन होत असून यंदाच्या पौर्णिमेला त्यांच्याकडून श्रीभक्तांनी उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी श्रीभक्तांच्या कडून होत आहे .
