महत्त्वाच्या बातम्या

एपीएमसी बाजारातील असुरक्षितता वाढते; व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश

नवी मुंबई : एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षा विभागाने व्यापारी यांना वेळोवेळी आपल्या गाळयात काम करणारे व राहणारे व्यक्ती यांची माहीती सादर करण्याचे अवगत करूनही बाजार समितीला कोणतीही सविसतर माहीती सादर करून परवानगी घेतलेली नाही ! सदर लोक आपण अनधिकृत पणे गाळयात व पेढीवर ठेवलेले आहेत ! अशाच गुन्हेगारी प्रवृतीचे व्यक्ती कडून बाजारात मारामारी ,फसवणूक , खून या सारखे गुन्हे घडवले गेले आहेत .

    तसेच शासन प्रतिबंधीत गुटखा ,अंमली पदार्थाची विक्री , मोबाईल व पाकिट , पैसे चोरीचे गैर प्रकार तसेच अवैध शेतमालाचा व्यवसाय बाजार आवार परिसरात या व्यक्तीकडून होतोय हे निदर्शनास येत आहे व यामुळे बाजारातील गुन्हेगारी वाढलेली असून बाजार आवारात सुरक्षितता धोक्यात आणलेली आहे तसेच सदर व्यक्ती पेढीवर स्वयंपाक करतात यासाठी स्टोवह , गॅस व विद्युत शेगडीचा वापर करतात यातून आग लागण्याची शक्यता असून जिवीत व वित हानी होऊ शकते हि बाब अत्यंत गंभीर व नियमबाह्य आहे.

     तरी असे सर्व गैरप्रकार त्वरित बंद करावेत तसेच आपल्या गाळयात काम करणारया व गाळयात अन पेढीत वास्तवयास राहत असलेल्या सर्व मेहता , कामगार , कर्मचारी यांची सविस्तर माहीती बाजार समितीस सादर करावयाची विनंती करण्यात येत आहे ! जर याबाबत खबरदारी न घेतल्यास आपणा विरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल याची गंभीर नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!