ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी व बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केले. आज दि 14 ऑक्टोबर रोजी सूर्याची पिल्ले या स्टेज शो मध्ये काम करताना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी सोबत हिंदी सिने सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. ‘ द कपिल शर्मा शो ‘ या विनोदी कार्यक्रमात ते काम करताना दिसले. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून त्यांनी अनेक भूमिका सकारल्या. तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यातून आपला ठसा उमटवला.
आळी मिळी गुप चिळी, जागो मोहन प्यारे, माझा होशील ना, होणार सुन मी ह्या घरची अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधे त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. अतुल परचुरे यांनी कँसर वर मात केली होती परंतु आजाराच्या पुनरवृत्तीने त्यांची प्रकृती खालावली व वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधना नंतर अनेकांनी शोक व्यक्त केला.
