महत्त्वाच्या बातम्या

T-20 च्या सामन्यातील हटके कामगिरीबद्दल संजू सॅमसनचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले कौतुक…

 
       बांग्लादेश विरुद्ध भारत अशा झालेल्या क्रिकेट T20 सामन्यात संजू सॅमसनने आपल्या हटके अंदाजात फलंदाजी केली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वांनी अभिनंदन केले. भारत व बांगलादेश या संघात झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने उत्तम कामगिरी करून बांग्लादेशच्या संघावर एकतर्फी विजयच मिळवला आहे.भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मालिका 3-0 ने विजय मिळवला आहे. 
          भारत व बांग्लादेश यामध्ये रंगलेल्या T 20 च्या पहिल्या दोन सामन्यात भारताचा फलंदाज संजू सॅमसन फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही परंतु शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशाविरुद्ध 297 धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये सर्वात महत्वाचे आणि मोलाचे योगदान संजू सॅमसनचे आहे. संजूने 111 धावांची इनिंग खेळली आणि या खेळीत त्याने 47 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 8 षटकार मारले. संजूने सूर्यकुमार यादव सोबत दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात लेगस्पिनर रशीद हुसेनच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकले. आणि 40 चेंडूत शतक पूर्ण केले. 
      या सामन्या नंतर संजू त्याच्या घरी म्हणजेच तिरुवनंतपुरमला गेला तेव्हा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्याची भेट घेतली व अभिनंदन केले. या सामन्या नंतर संजूच्या टॅलेंटची चर्चा सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!