तिरंगा”च्या वतीने राजेश स्वामी यांच्या प्रतिमेस अभिवादन
भुईंज : पाचवड, ता. वाई येथील तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयएफएस राजेश स्वामी यांच्या प्रतिमेस स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.तिरंगा इंग्लिश स्कूलमधील राजेश अभ्यासिका येथे फक्त तिरंगा परिवाराच्या उपस्थितीत हा अभिवादन सोहळा संपन्न झाला.
आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास सुरू असणाऱ्या आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या अभ्यासिकेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर आहेत. अवघ्या काही महिन्यात या अभ्यासिकेच्या तेरा विद्यार्थ्यांनी विविध शासकीय विभागात उज्वल यश मिळवले आहे. अशा यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत जावो यासाठी त्यांच्या अभ्यासात व्यत्यय नको या विद्यार्थीहीतैशी हेतूने तिरंगा परिवाराने परिवारापुरत्या सीमित अशा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी संस्थेचे सचिव जयवंत पवार, निवृत्त महसूल अधिकारी सुरेश बामणे, माजी प्राचार्य आर. एस. पाटील, तिरंगाच्या प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका शिल्पा पवार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.दरम्यान अभ्यासिकेचे हितचिंतक वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी निलेश जाधव, सुनील लोखंडे, जयवंत पिसाळ यांनीही अभिवादन केले.
