न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा: पर्यटन विकासावर सुसंवाद
मुंबई : न्यूझीलंडचे पंतप्रधान मा. क्रिस्टोफर लक्सन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुंबईतील राजभवन येथे महामहीम राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसमवेत उपस्थित राहून पंतप्रधान मा. क्रिस्टोफर लक्सन यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयांवर सुसंवाद झाला.
महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी राज्य शासन करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती यावेळी पंतप्रधान मा. क्रिस्टोफर लक्सन यांना दिली. राज्यातील गडकिल्ले आदी ऐतिहासिक, तसेच नैसर्गिक स्थळे आणि धार्मिक व आध्यात्मिक तीर्थस्थाने यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे.
या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्यासाठी न्यूझीलंडच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात जरूर यावे. यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान मा. क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. तसेच पर्यटन विभागाच्या वतीने एप्रिलमध्ये सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाकरिता त्यांना याप्रसंगी निमंत्रण दिले.
