महत्त्वाच्या बातम्या

खडकी येथे पारायण सोहळा उत्साहात साजरा

भुईज : आध्यात्म आणि विज्ञान एकत्र आल्यास जगावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य मिळू शकते हे नुकतेच विविध पारायण सोहळयातून व महाकुंभ मेळ्यातून आपण सर्वांनी अनुभवले आहे. संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्म्याच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवू या असे प्रतिपादन तिरंगा स्कुल इज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक सचिव पै. जयवंतआबा  पवार यांनी केले.

    खडकी तालुका वाई येथे तुकाराम बीज निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे शुभारंभप्रसंगी पै. जयवंत पवार बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व भुईज प्रेसचे संस्थापक जयवंत पिसाळ होते.

    यावेळी बोलताना पै. जयवंत पवार पुढे म्हणाले की गावचे गावपण आणि मानुसपण टिकवण्याचे ताकद फक्त संतांच्या विचारधारेत असून तो एकत्र आल्यास ख-या अवनि उत्सव सोहळे होतात. हेच मामुदायिक पारायणातून जपले जाते. याचा खडकी गावाने केलेला जागर म्हणजेच आध्यात्म होय असे सांगून त्यांनी वशस्वी करणा-या संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्माच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवू या असे सांगितले.

    प्रारंभी मान्यवरांचे स्वागत खडकी ग्रामस्थांच्यावतीने ह.भ.प. अरविंदबुवा शिंगटे यांनी केले. यावेळी दादासाहेव शिंगटेपाटील, किसनवीर कारखान्याचे संचालक संजय कांवळे, उपसरपंच प्रितम शिंगटे, शंकर शिंगटे, प्रशांत शिंगटे, संभाजीराव शिंगटे, नंदकुमार शिंगटे, संदीप सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी संकेत बर्गे,व स्वराली बर्गे,श्रीराज बर्गे यांचा अभंगवाणी कार्यक्रम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!