महत्त्वाच्या बातम्या

मुलीचे पालकत्व नाकारणाऱ्या पित्याला दणका

भुईंज : तिसऱ्या मुलीचे पालकत्व नाकारून पोटच्या गोळ्याला आपली लेक न म्हणण्याचा नराधमपणा करणाऱ्या नारायण नलावडे यांंचे ग्रामपंचायत सदस्यत्व अखेर शुक्रवारी रद्द ठरवून पदावरून अपात्र करण्यात आले.

    जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या या निकालाने केवळ कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर लेकींचा जन्म नाकारणाऱ्या प्रवृत्तींना सणसणीत चपराक बसली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की नलावडे याला आधीच्या दोन मुली असल्याने मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या मानसिकतेतून तिसऱ्या अपत्याचा निर्णय घेतला. तिसरी देखील मुलगीच झाल्याने संतप्त झालेल्या नलावडे याने त्या मुलीचे पालकत्व नाकारले. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र दाखल केले.

    याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार प्रफुल्ल शिंदे आणि चंद्रदीप भोसले यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी होऊन नलावडे याला अपात्र ठरवण्यात आले आहे.

    एकीकडे स्त्री जन्माचे स्वागत करा, लेकीला कमी लेखू नका, समानता याबाबत राजकीय नेते मोठमोठ्या बाता मारतात. मात्र या प्रकरणी अनेकांनी तोंड बंद ठेऊन स्त्री जन्माचा अनादर करण्याऱ्या प्रवृत्तीला पाठबळ दिले. दरम्यान खोटे शपथपत्र दाखल केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!