महत्त्वाच्या बातम्या

माझ्या नावाने पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा- नितीन बानगुडे पाटील

     सोशल मीडियावर गुढीपाडव्या संदर्भात माझे नाव वापरून काही पोस्ट पसरविण्यात येत आहेत. कोणीही गैरसमज निर्माण करणाऱ्या या पोस्ट फॉरवर्ड करू नयेत असे आवाहन शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले आहे. तसेच माझ्या नावाने अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेमार्फत कायदेशीर करवाई करण्याचा इशारा बानगुडे-पाटील यांनी दिला आहे.नवीन वर्ष ‘गुढीपाडवा’ या दिवशी साजरे न करण्यासाठी आवाहन करणारी पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्टमध्ये गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा संबंध जोडण्यात आला आहे. प्रा. बानगुडे-पाटील यांचे नाव वापरून ही पोस्ट फिरविण्यात येत असल्याने त्यांनी या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!