नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोरबे धरणाची मुख्य पाईप लाईन लिकेज
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी सी.बी. डी. बेलापूर, सेक्टर २८ येथे लिकेज झालेली आहे. सदर ठिकाणी तातडीने पाईप लाईन दुरुस्तीचे काम शुक्रवार, दि. २८ मार्च २०२५ रोजी, सकाळी ११.०० वाजता हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा २८ मार्च रोजी सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजे पर्यंत बंद करावा लागला आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दि. 29 मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी .या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नवी मुंबई महानगरपालिकेस कृपया सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
