सातारा एस टी आगारात सोयी सुविधांचा अभाव; परिसरात ड्रेनेज चेंबरमुळे दुर्गंधी
सातारा एसटी आगारात मोठ्या प्रमाणात बस ये जा करत असतात परंतू त्या प्रमाणात या आगाराकडून सोयी उपलब्ध होत नाहीत. संपूर्ण आगार खडडेमय झाले असून गेल्या दोन दिवसापासून मुख्य दरवाजाजवळ ड्रेनेज चेंबर दुर्गंधीयुक्त पाण्याने भरून वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना नाक मुठीत धरून आगारात प्रवेश करावा लागत आहे. त्याचबरोबर या ड्रेनेज चेंबर वर झाकण नसल्याने प्रवासी जायबंदी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरी प्रशासनाने या प्रसंगी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.
