महत्त्वाच्या बातम्या

गहाळ झालेले २५ मोबाईल पाचगणी पोलिसांनी नागरीकांना केले परत

भुईंज: पाचगणी  पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने मा. वरीष्ठांचे आदेशाने त्या अनुषंगाने मा वरीष्ठांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. मा वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.

     पाचगणी पोलीस ठाणे दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुच्या पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्यातुन शोध घेवुन एकुण ४,००,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २५ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यास सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद फोन नागरीकांना परत करण्यात आलेले आहेत.

      सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,  सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, वाई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार व सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक/९६२ तानाजी रतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल/७६२ उमेश रामचंद्र लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल ७०० अमोल धर्मु जगताप यांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!