महत्त्वाच्या बातम्या

बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सुशोभीकरण बनतोय तळीरामांचा अड्डा 

     सातारा शहराचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेला बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सुशोभीकरणास सातारा नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे उद्घाटनापूर्वीच उतरती कळा लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सत्यात उतरलेल्या या सुशोभीकरणाच्या प्रकल्पात लहान मोठे वयोवृद्ध आबालवृद्धांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या होत्या.यामध्ये  जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी, उत्तम प्रकाश व्यवस्था, कृत्रिम गवत, रंगरंगोटी त्याचबरोबर पोलीस चौकीचे सुशोभीकरण याचा समावेश आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस स्वच्छतागृहाचाही समावेश केला गेला आहे.
सदरचे काम पुणे येथील सोनाली कन्स्ट्रक्शन या आस्थापनेद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. अधिक माहिती घेतली असता सदर आस्थापनाने हा प्रकल्प जानेवारी २०२५ मध्येच  सातारा नगर परिषदेकडे हस्तांतरीत  केला असून  दोन्ही स्वच्छतागृहाच्या चाव्याही सातारा नगरपरिषद कडे सुपूर्द केल्या आहेत.
         सध्या सातारा नगर परिषदेकडून या .सुशोभीकरणाची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच कोणताच सुरक्षा रक्षक नसल्याने सदर जागेचा वापर ढोल ताशा सराव वाहन पार्किंग विविध प्रकारचे खेळांचे क्लासेस घेतले जात असून यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न बुडत आहे. तसेच येथील खेळण्याचा लहानांबरोबरच मोठ्या व्यक्तीही बागेतील खेळण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहेत. अनेक मद्यपी या जागेचा वापर मद्यपान व झोपण्यासाठी करत आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे  इलेक्ट्रिकचे बल्ब वायरींग  सामान चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या खेळण्याची मोडतोड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
सातारा वाहतूक शाखेने कोरेगावकडून सातारा शहराकडे जाणारी वाहतूक पुलाखालील बोगद्यातून वळवली आहे.  या पुलाखालची स्वच्छतागृह बंद असल्यामुळे सदर जागेचा वापर नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्यामुळे सदर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना पुलाखालचा प्रवास नकोसा झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये सदर विषय प्रसिद्ध करूनही  सातारा नगरपरिषदेने सदर स्वच्छतागृह विषयी कोणतीही कारवाई न केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

      सदर प्रकल्प खाजगी  तत्त्वावर देणार असल्याचे समजते. परंतु ही प्रक्रिया पूर्ण कधी ही होवू दया तत्पूर्वी स्वच्छतागृहाचा वापर नागरिकांना करू द्यावा अशी विनंती येथील नागरिक करत आहेत.  सदरचे स्वच्छतागृह वापरात नसताना देखील  स्वच्छ भारत मिशन या समितीस दाखवण्यात आले. समितीची दिशाभूल करून सातारा नगरपरिषदेने स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली व  सदर समितीची पाठ फिरताच दोन्ही स्वच्छतागृहास कुलूप  लावून नागरीकांची घोर निराशा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!