महत्त्वाच्या बातम्या

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या जलरथाचे पुजन

      महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तयार केलेल्या जलरथाचे पूजन आज उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण (महसूल), निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माण खटावचे नेते अंकुश गोरे, जिल्हा जल व मृद संधारण अधिकारी संतोष बुब, सहाय्यक अभियंता समाधान चव्हाण, सुजित मुथा यांचे शुभहस्ते करण्यात आले.

         यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष भरतेश गांधी, नंदकुमार खोत, नाम फाउंडेशन सातारा समन्वयक बाळासाहेब शिंदे, अण्णा कारंडे (काका), शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, सुमित शहा, श्रीकांत कुंभार, अक्षय कांबळे, शिवाजी राजगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील १०८ गावांमध्ये ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचे काम सुरु होत आहे. या कामाची जनजागृती भारतीय जैन संघटना सलग अकरा दिवस करणार आहे. प्रशासनाचे यात संपूर्ण सहकार्य राहणार आहे. तरी ग्रामस्थ व शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.भरतेश गांधी म्हणाले, प्रशासनाच्या हातात हात घालून या योजनेत सातारा जिल्हा कसा अव्वल राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!