महत्त्वाच्या बातम्या

अविनाश कचरे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदी निवड; आई वडिलांची व भावाची स्वप्नपूर्ती 

     अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या जावळी तालुक्यातील कुडाळ गावचे सुपुत्र अविनाश कचरे यांनी महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन सरळ सेवा परीक्षेमध्ये सम्पूर्ण महाराष्ट्रातून ३७६ वी रँक मिळवल्याने त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक”पदी निवड झाली.  आपल्या आई वडीलांनी मुलाने अधिकारी व्हावे व भाऊ अभिजित यांनी पाहिलेले स्वप्न व पुर्ण करत, जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. 
      श्री तुळशीदास हणमंत कचरे व मंगल तुळशीदास कचरे यांचे सुपुत्र असलेले  कु.अविनाश तुळशीदास कचरे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून शेतीतली कामे करून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत त्याने हे यश प्राप्त केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ.शाळा कुडाळ व माध्यमिक शिक्षण महाराजा शिवाजी हायस्कूल, कुडाळ येथे झाले आहे.यानंतर 11 वी व 12वी ही त्यांनी राजेंद्र महाविद्यालय खंडाळा येथून तर पदवीपर्यंतचे शिक्षण किसन वीर महाविद्यालय, वाई  येथुन कॉमर्स शाखेतून पूर्ण केले आहे. कु, कचरे याला एक मोठा भाऊ असून वडील हे जावली तालुका सहकारी खरेदी विक्री संघामध्ये रेशनिंग विभागामध्ये कार्यरत आहेत.
       या मिळालेल्या यशामुळे  त्यांचे कुडाळ गावातील नागरिकांनी गुलाल उधळून व पेढे वाटून आपल्या सुपुत्राचे ठिकाठिकाणी औक्षण करून स्वागत केले.  आई वडीलांनी  मोठ्या कष्टातून आम्हाला शिकविले,माझ्या भावाला अशा परीक्षा अडचणीमुळे देता आल्या नाहीत मात्र त्याने माझ्याकडून करून घेतलेली तयारी यामुळे आज माझी झालेली निवड झाली आई वडिलांच्या कष्ट व पाठीशी उभा असलेला भाऊ व त्याचे स्वप्न मी पुर्ण करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो.तसेच माझ्या वाईट काळात माझे मित्र आदेश किर्वे, मयूर लोखंडे,सौरभ लोखंडे,मयूर चिकणे,प्रशांत शिंदे, कल्पेश काळे यांनी मोठी साथ दिली त्यामुळे या यशात त्यांचाही वाटा मोलाचा आहे.असे अविनाश कचरे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!