महत्त्वाच्या बातम्या

वाई तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी गोरखनाथ गोरे तर सचिवपदी रविंद्र कांबळे यांची निवड 

     वाई तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय वाई येथे नुकतीच संपन्न झाली.अध्यक्ष गोरखनाथ गोरे(बापूसो शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली), उपाध्यक्ष दिपकराव ढाणे ( कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज भुईंज),उपाध्यक्ष संतोष वाडकर( न्यू इंग्लिश स्कुल बोरगाव), सचिव- रविंद्र कांबळे(त ल जोशी विद्यालय वाई),व सहसचिव- गिरीश गायकवाड( पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे)यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ संगीता पिसाळ,(लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालय शेंदूरजणे),गणेश गाडवे(रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव),राज्य कौन्सिल सदस्य- संजय वाईकर  (माध्यमिक विद्यालय खानापूर),विजय येवले (केदारेश्वर माध्यमिक विद्यालय आकोशी),प्रसाद यादव (परखंदी हायस्कुल, परखंदी),श्रीमती सुनीता केदार कमलाबाई जोशी विद्यालय केंजळ यांच्या निवडी झाल्या. 

        याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिनराव नलावडे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत वाई तालुक्यातील द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पतित पावन विद्यालय ओझर्डे चे मुख्याध्यापक श्री गिरीश गायकवाड आणि तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालय पाचवडच्या मुख्याध्यापिका सौ मुल्ला यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीच्या वर्गाच्या मूल्यमापनाबाबत मुख्याध्यापक श्री गोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच   महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिनराव नलावडे सर यांनी वाई तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्याबद्दलचे गौरवोद्गार काढले व त्यांनी विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे दापोली येथे होणाऱ्या मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
        यावेळी सातारा जिल्हा  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नितीनराव कोंडे,सचिव विजयराव येवले संघाचे राज्य सदस्य संजय वाईकर,तालुका संघाचे माजी अध्यक्ष महादेव चिकणे आणि सचिव श्री प्रसाद यादव यांची उपस्थिती होती. वाई तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक या सभेस उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे सर्वांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!