महत्त्वाच्या बातम्या

स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे म्हसवड येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.    गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी आपले राज्य सदैव तत्पर राहील, अशा पद्धतीची ग्वाही देणाऱ्या सरकारला कदाचित विसर पडला असेल की महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा लाखो लोक बेरोजगार आहेत, हाताला काम नाही, पिण्याला पाणी नाही, अशा लोकांचे जीवनमान उंचावण्याऐवजी आपण जर या सर्व लोकांना मातीत घालण्यासाठी स्मार्ट मीटरचा घाट घातला आहे का? असा सवालही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. यावेळी युवक क्रांती दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, महादेव काटकर, शिवाजी जावीर, विठ्ठल ढगे, राजेंद्र दोशी, मधुकरराव भोकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!