महत्त्वाच्या बातम्या

कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन ही अधिकाऱ्यांनी त्यास दाखवली केराची टोपली

     गेल्या ४० वर्षातील पहिला मान्सून पूर्व पाऊस हा मे महिन्यात पहिल्यांदाच वादळीवाऱ्या सहित झाला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या भुईमूग, आंबा, डाळिंब, कांदा, मका, कलिंगड, खरबूज, भाजी पाला या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन ही अधिकाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखवली आहे. हे लक्षात घेता युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी माळशिरस तहसील ऑफिसला निदेवदन देऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने केली आहे.अन्यथा युवा सेना रस्त्यावर्ती उतरेल असाही इशारा गणेश इंगळे यांनी दिला आहे. हे निवेदन माळशिरस चे नायब तहसीलदार अमोल कदम यांनी स्वीकारले या वेळी शिवसेना तालुका समन्वयक पिंटू तात्या चव्हाण युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, दत्ता साळुंखे, उत्तम ताटे, रामभाऊ गायकवाड इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!