महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत BMW कार मधून दरोदडेखोरांना केले जेरबंद ; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

     राज्यात चोरीच्या घटना आपण सतत ऐकत असतो. भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे.चक्क बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.या टोळीच्या ताब्यातून एक बीएमडब्ल्यू कार,दोन पिस्टल, मिर्ची पूड, पक्कड, मोबाइल, दोन गावठी कट्टे,  आणि इतर साहित्य असा एकूण 17 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
        मिळालेल्या माहितीनुसार कार मध्ये पाच जण होते त्यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे
  गस्ती दरम्यान लागला सुगावा
शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. दरम्यान भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरातील  मोकळ्या मैदाना जवळ रस्त्याच्या बाजूलाच पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यानंतर   वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे, सहा. पोलिस निरीक्षक योगेश गायकर व पोलिस पथकाने घटना स्थळी पोहचून संबंधित बीएमडब्ल्यू कार चा पाठलाग करत कार थांबवली त्यातून एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून शोएब शाहीद शेख, नौशाद मक्सुद आलम खान, अफताब अफसर शेख, शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध  शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून शनिवारी सकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले. चारही आरोपीना 4 जून पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.   शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!