महत्त्वाच्या बातम्या

स्वप्ना दिलीप राजगे यांना अहिल्यारत्न पुरस्कार; वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आदर्श कामगिरी

    पिंपरी (ता. माण )येथील उच्चशिक्षित व नामवंत परिवारातील स्वप्ना दिलीप राजगे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या वतीने अहिल्या रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यावेळी उपस्थित माजी. आमदार रामहरी रुपनवर,ऑल इंडिया धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे,  श्री सद्गुरू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व दैदीप्यमान कार्य केल्याबद्दल स्वप्ना राजगे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सध्या त्या दहिवडी ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत आहेत.

        आदर्श कामगिरी व पुरस्कार मिळाल्याबद्दल  ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, डॉ. संदीप पोळ, डॉ बाबासाहेब दोलताडे,अशोकशेठ राजगे, आप्पा राजगे, गुलाब राजगे,महेंद्र अवघडे, नितीन राजगे, दिगंबर राजगे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!