२४ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये विद्यापीठ युवा महोत्सव…कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या द्वितीय युवा महोत्सवास मान्यवरांची उपस्थिती
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय युवा महोत्सव छत्रपती शिवाजी कोलेज सातारा या घटक महाविद्यालयात २४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून या युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ या दिवशी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. विद्यार्थी विकास मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेज आयोजित या युवा महोत्सवाचे उद्घाटन सदगुरु गाडगे महाराज कराड कॉलेजचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमास अप्पी आमची कलेक्टर ,लागीर झाल जी .. इत्यादी मालिकेत काम केलेले अभिनेते संतोष पाटील तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य प्रा. एन. बी. माने, चित्रकार श्री. बबन माने हे उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय कुंभार,रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव,धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.के सावंत, विद्यार्थी विकास मंडळ संचालिका,डॉ.मनीषा पाटील,सांस्कृतिक समन्वयक मा.राजेंद्र संकपाळ,तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.डी.डी.नामदास, प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे,डॉ.आर.आर.साळुंखे, सर्व संचालक, चेअर प्रोफेसर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी दिली.
या युवा महोत्सवात सांघिक स्पर्धेत लोकनृत्य ,लघुनाटिका ,मूकनाट्य,भारतीय समूह गीत ,लोकवाद्यवृंद यांचा समावेश असून वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धेत नकला ,मराठी वक्तृत्व ,हिंदी वक्तृत्व ,इंग्रजी वक्तृत्व ,शास्त्रीय गायन ,पाश्च्मात्य एकल गायन ,स्थळ चित्र ,व्यंग चित्र ,भित्ती चित्र निर्मिती ,कातरकाम ,स्थळ छाया चित्रण ,माती पासून प्रतिकृती निर्मिती ,लावणी नृत्य इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेत विद्यापीठातील १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धा झाल्यानंतर समारोप समारंभ घेतला जाणार असून या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी श्री. तुषार भद्रे उपस्थित राहणार आहेत. समारोप समारंभात स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले जाणार आहे.
