भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचे निवेदन
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवली शहराचे आमदार मा. रविंद्रजी चव्हाण यांना सत्यजित दादा पाटणकर यांचे समर्थक यांनी पाटण तालुक्यातील रुवले गावातील निधी अभावी रखडलेल्या विकासकामांचे निवेदन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करत रस्त्यांची दुरवस्था आदी विकासकामे रखडली असून सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बोलून दाखवल्या. अनेक समस्यावरती चर्चा करण्यात आली. यावेळी ढेबेवाडी उपाध्यक्ष धनाजी साळुंखे. धनाजी कदम.युवा नेते नितिन मोरे. पांडुरंग साळुंखे.प्रकाश मोरे. आणि रुवले ग्रामपंचायत पंचायत सदस्य तानाजी बंडू माने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
