महत्त्वाच्या बातम्या

दहिवडी कॉलेज मध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा- प्रभाकर देशमुख

     दहिवडी कॉलेज दहिवडी मध्ये विद्यार्थ्यांसाठी नानाविध भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व उपलब्ध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले. दहिवडी कॉलेजमध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत रसायनशास्त्र प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ व बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम, अद्ययावत वर्ग खोल्या, संगणक प्रयोगशाळा यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव विकास देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील जाधव व अजित पवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदकुमार खोत, तानाजी मगर, सुरेंद्र मोरे, विशाल पोळ, उदय जगदाळे, विलासराव शिंदे, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. संजय खेत्रे, उपप्राचार्य बाळू जाधव, मारुती लुबाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

      प्रभाकर देशमुख म्हणाले, या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुभवी प्राध्यापक, अद्यावत इमारती, उत्तम साहित्य या ठिकाणी आणले जात आहे. विकास देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पदाधिकारी व कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील आहेत. सुधीर कुंभार यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित ऐवळे यांनी सुत्रसंचालन केले तर वैशाली खाडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!