महत्त्वाच्या बातम्या

वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात करिअर संधी-प्रा. जयवंत पवार 

 सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने “वाणिज्य विभागातील करिअर संधी” विषयावर संवाद सत्राचे आयोजन केले होते.
प्राचार्य डॉ हणमंत जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख वक्ते किसन वीर महाविद्यालय, वाई वाणिज्य विभागात कार्यरत प्रा. जयवंत यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले- “सध्याच्या नव्या शैक्षणिक धोरणाची मीमांसा करताना शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी सोबत राहून काम करणे आवश्यक आहे, पारंपरिक शिक्षण पद्धतीत चार भिंतीत शिकणारा विद्यार्थी महत्वाचा नसून जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी व्यवस्थापन, ई-बँकिंग-कौशल्य,शेअर बाजार कौशल्य विकसित करणे गरजेची आहेत.यासोबत संवाद आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी पात्रता विविध कोर्स आधारे मिळवावीत असे आवाहन केले.” विभागप्रमुख प्रा. निकिता पवार यांनी प्रास्ताविक,प्रा.श्वेता कदम यांनी आभार,सूत्रसंचालन प्रा. सीमा पवार यांनी केले. यावेळी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!