महत्त्वाच्या बातम्या

निवृत्त एसीपीवर गुन्हा दाखल…. सूनेने केले हे आरोप

पुणे: सासऱ्यानेच सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी निवृत्त एसीपी, त्यांची बायको व मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त एसीपीच्या मुलाचे गेल्या महिन्यातच 30 वर्षीय तरुणी सोबत लग्न झाले. एसीपीचा मुलगा हा मुलांना जन्म देऊ शकत नाही ही बाब त्याच्या कुटुंबियांनी लपवली होती. लग्नानंतर लगेचच आरोपी सासरा हा सुनेच्या खोलीत घुसला व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला.

         माझा मुलगा मुलांना जन्म देऊ शकत नाही त्यामुळे तुला माझ्यासोबतच हे सर्व करावे लागेल असे बोलू लागला. त्यानंतर ती महिला घरातून पळून जाण्यात यशस्वी झाली व तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सदर महिलेच्या जबाबाच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली आरोपी सासरे, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!